"देवदर्शनासाठी गेलेल्या लग्न दोन दिवसावर आलेल्या तरुणीचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू" तीन दिवसांवर लग्न आलं असताना तरूणीचा अपघातात मत्यु झाल्याची दुख:द घटना अकोलामधील पातुर तालुक्यात घडली आहे. अपघात झालेल्या तरूणीचं नाव पल्लवी धोत्रे असं होतं. २६ एप्रिलला तिचा विवाह होणार होता.

पल्लवी आणि तिचे वडील दुचाकीवरून पातूर-बाळापूर रस्त्यावरून वाडेगावकडे जात होते. मात्र देऊळगाव बसस्थानकावर काळाने घात केला. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पल्लवीच्या अंगावरून ट्रॅक्टरचं चाक गेलं. 

अवघ्या दोन दिवसांवर लग्न आल्यामुळे घरात सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. लग्न झाल्यावर लेक सासरी जाणार होती मात्र काळाने तिचे हात पिवळे होण्याअगोदरच तिच्यावर घाला घातला. पल्लवीच्या मृत्युने धोत्रे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पल्लवी विव्हरा येथे रहात होती. दरम्यान, २६ एप्रिलला पल्लवीचा विवाह होणार होता. अपघाताआधी वडिलांसोबत ती देेवीचं दर्शन करण्यासाठी गेली होती. 

Post a Comment

0 Comments