राज्यातील पहिल्या महिला आयएफएस अधिकारी! बार्शी व करमाळाकरांचा शिरपेचात मानाचा तुरा "सुवर्णा रविंद्र माने-झोळ" यांची भारतीय वनसेवेत पदोन्नती


बार्शी/प्रतिनिधी:

राज्याला पहिल्या महिला आयएफएस अधिकारी देण्याचा मान बार्शी व करमाळा तालुक्याला मिळाला असून तालुक्यातील वैराग तर माहेर करमाळा तालुक्यातील वाशिंबे हे सासर असणार्‍या सुवर्णा रविंद्र माने-झोळ यांची वनविभागात राज्य वनसेवेतून केंद्रीय सेवेत (आयएफएस) पदोन्नती झाली आहे.


पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती उपवनसंरक्षक (प्रादेशिक) या पदावर अहमदनगर येथे झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यातील वन विभागातील वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल अशा अनेक पदांवर यापुर्वी महिलांनी काम केले आहे. परंतू राज्यसेवेतून आयएफएस होणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांची २०१६ च्या भारतीय वनसेवेच्या तुकडीत नियुक्ती झाली आहे.

सुवर्णा माने या मूळच्या करमाळा तालुक्यातील वाशिंबे या गावच्या असून त्यांचे पती रविंद्र माने हे सध्या प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी या पदावर सोलापूर येथे कार्यरत आहेत. सुवर्णा माने यांची २००९ मध्ये थेट सहाय्यक वनसंरक्षक या वर्ग १ च्या पदावर सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत निवड झाली होती. त्यावेळी पहिल्यांदाच सहाय्यक वनसंरक्षक या वर्ग १  च्या पदावर ८ महिलां व २५ पुरुषांची नियुक्ती केली गेली.

आज त्या तुकडीचे ६ अधिकारी भारतीय वनसेवेत दाखल झाले असून त्यापैकी सुवर्णा माने या एकमेव महिला आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) भारतीय पोलिस सेवा व( आयपीएस)भारतीय वन सेवा या तीन अखिल भारतीय सेवेमध्ये सरळसेवेने व राज्यसेवेतून पदोन्नतीने अधिकार्‍यांची नियुक्ती होते. त्यात भारतीय वनसेवेत सुवर्णा माने यांची निवड झाली असून त्यांचा समावेश २०१६ च्या तुकडीमध्ये करण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments