पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात कोरोना उच्चांक; पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ६०० नवीन कोरोना रुग्णांची भर


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकनतर पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाची परिस्थिती कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे.  आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भागात सुमारे ६०० नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर सहा जणांचा कोरूना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मतदारसंघात अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे मृत्यूच्या दारात ही वाढ होत आहे. पंढरपूरसह मंगळवेढा, माळशिरस, सांगोला, करमाळा तालुक्यात कोरोनाने थैमान घातली आहे.

पंढरपूर, माढा, माळशिरस तालुक्यात कोरोनाचा उच्चांक..
सोलापूर ग्रामीण भागामध्ये कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यात पंढरपूर, माढा, माळशिरस, मंगळवेढा  तालुक्यातील सुमारे आठ हजार कोरोना बाधित रुग्ण हे उपचार घेत आहेत. आज आलेल्या अहवालानुसार चार तालुक्यांमध्ये तेराशे नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्युदर पैकी ५० टक्के मृत्युदर पंढरपूर मंगळवेढा माळशिरस मंगळवेढा तालुक्यात नोंद झाला आहे. त्यात माळशिरस तालुक्यात सर्वाधिक २१०० रुग्ण हे उपचार घेत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
सोलापूर ग्रामीण भागात मोठ्या कोविड सेंटरची गरज..
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरूना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना स्वतःच्या कोविड सेंटरची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांना कोविड सेंटर उभारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत सेंटर उभारणीसाठी जोर धरत आहेत. पंढरपूर तालुक्यात सुमारे १९ नवीन सेंटर उभारण्यात आले आहे..

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची परिस्थिती बिकट..

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीचे १७ एप्रिल रोजी मतदान पार पडले. प्रचार सभेमध्ये प्रस्थापित पक्षांकडून हजाराच्या सभा घेण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मतदार संघात कोरोनाचा अक्षरशा स्फोट  झाला आहे. २९ एप्रिल रोजी अहवालामध्ये दोन्ही तालुक्यात सुमारे सहाशे नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन्ही तालुक्यात साडेतीन हजार रुग्ण हे विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. सहा जन्यच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मतदार संघाची परिस्थिती बिकट होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments