बार्शीचा झेंडा पुन्हा एकदा सातासमुद्रापार! वेस्ट इंडिज लिजेंड संघाच्या प्रशिक्षकपदी बार्शीपुत्र आनंद शेलार



बार्शी/प्रतिनिधी:

आनंद शेलार यांची वेस्ट-इंडिज लिजेंडस् या संघासाठी प्रशिक्षक म्हणून निवड. रायपुर, छत्तीसगड येथे पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज या आंतरराष्ट्रीय क्रिकेट टूर्नामेंटमधे सहा देश सहभागी झाले होते. यामधे भारत, वेस्ट इंडिज, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, बांग्लादेश अश्या बलाढ्य संघांचा सहभाग होता. 

वाहन चालवताना नियमांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी याचा संदेश देणार्‍या या सामन्यांमध्ये महान खेळाडू सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, केविन पीटरसन, दिलशान, जाँटी ह्रोडसॄ, खालीद महमूद, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कैफ, सनथ जयसूर्या, रसेल अरनॉल्ड, टिनो बेस्ट, Ridley Jecobs यांसारख्या खेळाडूंनी आपल्या अप्रतिम व आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. 

आतापासून ही सिरीज प्रत्येक वर्षी घेण्यात येणार आहे. २० दिवस चाललेल्या या साखळी सामन्यांमधे बार्शीचे आनंद शेलार यांना वेस्ट-इंडिज संघाला आणि ब्रायन लारा, Dwayne Smith, Tino Best, Narsingh Deonarien, Ridley jecobs, Carl Hooper, Suleman Benn, Dinanath Ramnarien अश्या महान खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. कठोर मेहनत अणि जिद्दीचा जोरावर बार्शी सारख्या छोट्या शहरातील मुलगा असूनदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये प्रशिक्षक म्हणून यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे. 

आनंद शेलार यांना श्री रवि गायकवाड आणि त्यांचे बंधू श्री प्रदीप गायकवाड व प्रशिक्षक श्री उदय डोके यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य अणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे. या सर्वांच्या अनमोल सहकार्याने आनंद शेलार यांनी संयम अणि शिस्तीने आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवले. त्यांनी श्री रवि गायकवाड शत-शत आभार मानले आणि येणार्‍या भवितव्याचे सर्व श्रेय त्यानाच दिले. 

आनंद शेलार यांचे पुढचे ध्येय IPL च्या सामन्यांचे असून त्यासाठी त्यांनी मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांना श्री गौतम कांकरिया यांनी मोफत जिम, जलतरण तलाव आणि मैदान उपलब्ध करून दिले आहे.
त्यांना सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे सर्व पदाधिकारी, बार्शी तालुका क्रिकेट संघटनेचे सर्व पदाधिकारी, श्री गौतम कांकरिया व आर. के. क्लब बार्शी चे सर्व सदस्य आणि श्री विकास माने व बार्शी शहर पोलिस यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

या टूर्नामेंट चे उद्घाटन छत्तीसगड चे मुख्यमंत्री श्री भूपेश बघेल यांच्या हस्ते करण्यात आले. अटीतटीच्या झालेल्या फाइनल सामन्यात कप्तान सचिन तेंडुलकर च्या इंडिया Legends संघाने श्रीलंका Legends संघावर मात करत सीजन-१ ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

Post a Comment

0 Comments