ऑनलाईन शिक्षणाकरिता सरकारकडून 'मोफत ऑनलाईन रिचार्ज' अशा मेसेजेसवरून फसवणूक...


 आजच्या डिजिटल जगात ऑनलाईन फसवेगिरीचे प्रमाण देखील वाढले आहे. नोकरी, फ्री रिचार्ज यासारखे आमिष यात दाखविण्यात येते. या जाळ्यात न अडकता चौकसपणे विचार केला तर, हे टाळता येऊ शकते.

 सरकारच्या वतीने ऑनलाईन शिक्षणाकरिता १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना मोफत रिचार्ज देण्यात येत असल्याचाची लिंक सध्या मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड होत असून ही ऑफर मिळविण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते, तो मॅसेज आणि लिंक खोटी आहे

नुकताच व्हाट्स अपवर रोज ५००० रुपये कामविता येईल आणि त्याकरिता एक ऑनलाईन ट्रेनिंग होईल असा मॅसेज मोठ्या प्रमाणात फॉरवड झाला होता. यात एक लिंक सुद्धा देण्यात आली होती. 

या लिंक वर क्लिक केल्यावर होणारे दुष्परिणाम जर तुम्हाला असा एसएममएस मिळाला असेल तर लिंकवर क्लिक करू नका कारण यामुळे मोबाइल डिव्हाइसवरून डेटा आणि माहिती चोरी होऊ शकते 

Post a Comment

0 Comments