बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील नेते शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी कोरोनाची लस घेतली. आज रोजी पानगाव पीएससी याठिकाणी माननीय डॉ. अशोक ढगे डॉ.जानराव यांच्या समोर कोरोनाची लस घेतली.
यावेळी सर्व सिस्टर सर्व स्टाफ यांच्यासमक्ष कोविड १९ ची लस आम्ही घेतली, मी सर्वांना विनंती करतो कोरोना लस घ्यावी. राजमाता अन्नछत्रातील कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते मी लस घेत नाही म्हणून ते स्वतः घेत नव्हते.
सगळ्याच्या त्यांचा जीव महत्त्वाचा आहे, तसेच माझी आई ८४ वर्षाची आहे, तिच्या नावानं राजमाता इंदुताई आंधळकर अण्णा छत्रालय चालते, तिनेसुद्धा मी लस घेतल्याशिवाय स्वतःला घेणार नाही असं म्हटल्यामुळे आज मी लस घेतलेली आहे. तरी कोरोना लस घ्यावी असे प्रतिपादन शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केले.
0 Comments