…तर नवीन गृहमंत्री पदाच्या रेसमध्ये ‘या’ नेत्यांची नावे



 १०० कोटी कथित वसूल प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. अशी माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

मात्र नवीन गृहमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे. गृहमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. नवीन होणारा गृहमंत्रीही त्यांच्याच पक्षाचा असणार आहे. मात्र नवीन गृहमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार असा सवाल सर्वांच्या मनात सारखा येत आहे. अनिल देशमुख यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसमधील  नेत्यांची नावे समोर येत आहेत.

१) जयंत पाटील २) अजित पवार ३) दिलीप वळसे पाटील ४) हसन मुश्रीफ असे उमेदवार गृहमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे नवीन गृहमंत्र्यांचे नाव सुचवतील. राष्ट्रवादीशी कायम निष्ठावंत असलेले जयंत पाटील यांची वर्णी लागण्याची अत्यंत दाट शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

त्यापाठोपाठ या रेसमध्ये असलेले दुसऱ्या नंबरचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. यांची देखील गृहमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments