"....म्हणून पतीने लावून दिले पत्नीचे प्रियकरासोबत लग्न"


आपल्या बायकोचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचं कळाल्यानंतर पतीने स्वतः आपल्या बायकोचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच चर्चा रंगली आहे.

संबंधित घटना बिहारमधील असून सूल्तानगंज येथील एका जोडप्याचं लग्न सात वर्षांपुर्वी झालं होतं. काही वर्ष त्यांचा संसार अगदी व्यवस्थित चालू होता. त्यांना दोन मुलं देखील झाली. मात्र लग्नाच्या सात वर्षांनंतर संबंधित पत्नीला दुसऱ्या पुरुषावर प्रेम झालं. पत्नीचं नाव सपना असं आहे. 

विरोध केल्यानंतर देखील सपनाने आपले प्रेमसंबंध चालू ठेवले. अनेकदा विरोध करुन सुद्धा सपनाने न ऐकल्यानं उत्तमने वैतागून सपनाचे तिच्या प्रियकरासोबत लग्न आयोजित केलं. या लग्नामध्ये दोन्ही बाजूचे लोक उपस्थित होते. एवढच नाही तर सपनाच्या दोन मुलांनी देखील या लग्नात उपस्थिती लावली. लग्नाच्या दरम्यान उत्तमच्या डोळ्यात पाणी होते. मात्र त्याने बायकोच्या प्रेमासाठी आपल्या संसाराचा त्याग केला.

दरम्यान, सूल्तानगंज येथील दुर्गा मंदिरात हे लग्न पार पाडलं. अशाप्रकारच्या लग्नाची माहिती मिळताच लग्नाच्यावेळेस अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.

Post a Comment

0 Comments