कोरोना संकटात भारताने जशी मदत केली तशीच आम्ही देखील करण्यास कटिबद्ध, अमेरिकन अध्यक्षांची ग्वाही

 

 भारत आणि अमेरिका हे दोन असे देश आहेत, ज्यात कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक झाला आहे. परंतु कोरोना लस बनवण्यासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या निर्यातीवर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी बंदी घालून भारताला मोठा झटका दिला. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या या निर्णयावर टीकाही झाली. पण भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्या चर्चेनंतर यावर तोडगा निघताना दिसत आहे.

अमेरिकेने आता बंदीची भूमिका मागे घेऊन हरप्रकारचं सहकार्य करण्याचं म्हटलं आहे.या सकारात्मक बदलादरम्यानच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. ज्यात त्यांनी कोरोना संकटात भारताला मदतीचा हात देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षांनी ट्वीट केलं आहे की, "महामारीच्या सुरुवातीला जेव्हा आमच्या रुग्णालयांवर मोठा दबाव होता, त्यावेळी भारताने अमेरिकेला ज्या प्रकारची मदत केली होती, त्याच प्रकारे भारताला संकटसमयी मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." अमेरिका भारताला हरतऱ्हेची मदत करण्यासाठी तयार आहे. अमेरिका भारताला लस बनवण्यासाठी आवश्यक त्या कच्च्या मालाचा पुरवठा करेल.

फ्रॅण्ट लाईन कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी अमेरिकेकडून तातडीने रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किट, व्हेंटिलेटर आणि पीपीई किट दिले जातील.

Post a Comment

0 Comments