प्रा.डॉ.प्रभाकर माने /शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
मौजे धरणगुत्ती मध्ये शिरोळ तालुका युवक काँग्रेस व पत्रकार रोहित जाधव युवा मंचच्या वतीने समाजातील वंचित घटकांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांनी या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व कोरोना योध्दा सन्मान प्राप्त घटक व मान्यवरांचा स्वागत केले.पत्रकार जाधव यांनी प्रास्ताविका मध्ये या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू मांडताना ते म्हणाले की,धरणगुत्ती गांव नेहमीच समाजाभिमुख विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लोकप्रिय आहे. मात्र काही घटक मान-सन्माना पासून नेहमीच वंचित असणारा असतो जे समाजासाठी जीवावर उदार होऊन सातत्याने अहोरात्रपणे सेवाभावी वृत्तीने काम करीत असतो. असेच काही वंचित घटक जे कोरोनाच्या काळात प्रंचड काम केले आहेत अशा घटकांचा विचार करून शिरोळ तालुका युवक काँग्रेस व पत्रकार रोहित जाधव युवा मंचने मानवतावादी विचार डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.राकेश शशिकांत कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मांगल्याचे प्रतीक म्हणून तुळशीचे रोप प्रदान करण्यात आले व उपस्थितांनी वाढदिवसानिमित्त टाळ्या वाजवीत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून प्रचंड खर्च करणाऱ्या लोकांना त्यांनी आदर्श घालून दिला. यातून या गावातील राज्यकर्ते व गावकऱ्यांची उदात्त मानसिकता दिसून येते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विचार व कृतिशील व्यक्तिमत्वाने नेतृत्व करणारे मा.शेखर पाटील( शिरोळ दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक) हे कोरोना योद्ध्यांना यथोचित मार्गदर्शन करीत असताना ते सुरुवातीस म्हणाले की, आयोजकांनी या योजनांचा सन्मानार्थ हा सोहळा आयोजित करून समाजासाठी प्रेरणा दिली आहे अशा प्रकारचा गौरव उच्चारण याप्रसंगी त्यांनी काढले. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, हे सर्व उपस्थित कोरोना योद्धे स्वतःचा स्वार्थ न पाहता देशप्रेमाने व सेवाभावी भावनेने प्रेरित होऊन समाजातील घटकांना या महामारी पासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा घटकांना योग्य तो मानसन्मान मिळणे गरजेचे असून यामधूनच हे मंडळी प्रेरित होतील आणि पुनश्च समाज स्वास्थासाठी झटत राहते.
यावेळेस प्रमुख उपस्थित असणारे बालविकास प्रकल्प अधिकारी मा.संगीता गुजर यांनी या कार्यक्रमाचा कौतुक करून महिलांना मानसन्मान देणारे असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन निस्वार्थी भावनेने काम करीत राहणे हे आपले कर्तव्य आहे अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या सरपंच सौ.विजया कांबळे यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा देऊन कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमास उपसरपंच जीवनकुमार रजपूत उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह मध्ये हा कोविड योध्दाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कोरोना काळात अत्यंत निकराने या महामहारीशी झुंज देत लढाई जिंकणाऱ्या अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी,डॉक्टर,नर्सेस शासकीय कर्मचारी या सर्वांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत व प्रदूषण टाळून निसर्गप्रेमी बनावे या भावनेचा संदेश देत भेट म्हणून आरोग्यास लाभदायक असणारी तुळशीचं रोप आणि सन्मान पत्र देवून सर्वांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख मंडळींनी मनोगत व्यक्त केली तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयसिंगपूर कॉलेजचे प्रा. डॉ.प्रभाकर माने यांनी केले. या कार्यक्रमात भावनिकतेचे बंध निर्माण करणारे आभार प्रदर्शन श्रीमती उषा कांबळे मॅडम यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य- पवित्रा कांबळे,मनोहर माळी,विलास जाधव,कोमल कडोले, भाऊसो कांबळे,सुरेश पखंडी,गौरव कनवाडकर- तलाटी,उदयमाने आरोग्य सेवक,सपुरा मुल्ला-आरोग्य सेविका,
स्वप्ना पाटील -CHO ,संगीता गुजर-बालविकास प्रकल्प अधिकारी,
धीरज कांबळे-रायगड पोलिस,
अनिल कांबळे,निखिल केसरे,स्वप्नील रजपुत,निशांत पवार,सुनील कारंडे, बजू कांबळे, त्याच बरोबर गावातील नागरिक,कर्मचारी वर्ग ,पत्रकार बंधू व एन एन एस विद्यार्थी स्वयंसेवक प्रतिनिधी गणेश कुरले उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांना अधिन राहून करण्यात आले होते.या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1 Comments
खूप च छान सर
ReplyDelete