करमाळा/प्रतिनिधी:
सोलापूर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील सराईत गुन्हेगारांवर कार्यवाहीचा बडगा स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी उचललेल्या सततच्या कार्यवाही वरून दिसत आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
अशीच धडाडीची कार्यवाही इरण्या उर्फ किरण अप्रिशा भोसले वय २२ राहणार शेलगाव- वांगी तालुका. करमाळा गावच्या शिवारात चोऱ्या करणारा सराईत आरोपी याच्यावर कुर्डूवाडी, माढा, करमाळा या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल असून या आरोपींविरुद्ध मोका, दरोडा, जबरी चोरी ,हत्यार अधिनियम यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याला सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना अटक करण्याचे आदेश दिले होते, दिनांक ०४ रोजी सदरचा आरोपी हा शेलगाव वांगी तालुका करमाळा गावातील बस स्टैंड वर येणार असल्याची माहिती मिळताच. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या विशेष पथकाने शिताफीने आरोपीस अटक करून पुढील तपासासाठी करमाळा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
0 Comments