सोलापूर/प्रतिनिधी:
मंगळवेढा, कामती मंद्रूप वळसंग, येथे खूनासह दरोडा, खुनाचा प्रयत्न घरफोडी, मंदिर चोरी, मोका विविध पाच गंभीर गुन्ह्यात बऱ्याच वर्षापासून पाहिजे, असलेला दरोडेखोर वेळोवेळी टोळी व टोळीतील सदस्य बदलून सोलापूर व सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डर लागत कर्नाटक भागात दरोडे घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्हे करीत असल्याने संबंधित आरोपीस पकडणे कामी मागील अनेक वर्षापासून मोठ्या फौजफाट्यासह पोलीस जाऊनही तो सापडत नव्हता तो चोरलेले दागिने आश्रयास राहत असलेल्या ठिकाणी ओळखीच्या लोकांकडून ठेवून त्यांच्याकडून काही रक्कम घेत असे अशा दरोडा व जबरी चोरी घरफोडी इत्यादीसारख्या गुन्ह्याचा प्रतिबंध करण्याकरिता सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते एलसीबी चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना आदेशित केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकास आरोपी नातेवाईकाकडे गेलेला असून पत्नीच्या औषध उपचाराकरता येणार असल्याची माहिती कळताच वेशांतर करून आरोपी पत्नीच्या औषध उपचाराकरिता टाकळी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे आला असता पोलीस पथकाने सापळा रचला असता, आरोपीला आपल्या पोलीस मागावर आहेत संशय आल्याने तो तेथून दवाखान्याचा उंच तारेच्या कंपाउंड वरून उडी मारून पळून जात असताना त्यास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पथकासह पाठलाग करून शिताफीने त्यास ताब्यात घेतले व त्यांनी इतर आणि गुन्हे केलेले असल्याची माहितीही दिली.
त्याच्याकडील कामती मंद्रूप पोलीस ठाणे कडील घरफोडीचे एकूण सात गुन्हे व पुणे हडपसर येथून चोरलेले एक शाईन मोटरसायकल सह एकूण आठ गुन्हे उघडकीस आले त्याच्याकडील सोने चांदी दागिने एक शाईन मोटरसायकल सह एकूण ८ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची धडाडीची कामगिरी सोलापूर ग्रामीण एलसीबी च्या पथकाने केली.
0 Comments