सोलापूर! भाजपच्या नगरसेवकाची अजब मागणी; आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा


सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मागील तीन दिवसांपासून सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. दोन दिवस ग्रामीण भागाचा आढावा घेतल्यानंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

मात्र पोलिसांना याची चुणूक लागताच नियोजन भवन बाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवेदन देण्यास येणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी कसून तपासणी केली. तर काळे कपडे परिधान करून येणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांचे प्रवेश देखील पोलिसांनी रोखले.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे पालकमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळी टोपी परिधान करून नियोजन भवन येथे आले होते. सोलापूरसाठी आतापर्यंत तीन पालकमंत्री नियुक्त करण्यात आले. मात्र हे सर्व पालकमंत्री बिनकामाचे असून सोलापुरातील आमदारांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात यावी, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती पालकमंत्री म्हणून करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली.

Post a Comment

0 Comments