करमाळा ! कोरोनाच्या नावाखाली श्रेय घेण्यावरून आजी-माजी आमदारांसह राजकारण तापलं, माळ्याची मका आणि कोल्ह्याची भांडण



करमाळा/ प्रतिनिधी:
               
गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात राज्यकर्ते गप्प होते, आणि सामाजिक संघटनेचे दशरथ आण्णा कांबळे यांची संघटना सर्व सामान्य जनतेच्या हाकेला धावून जात होती, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष वारे, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, व इतर संघटनांनी कोरोनाच्या काळात जोमाने काम केले, यावर्षी वेगळंच घडतं आहे, कोरोनाच्या नावाखाली आजी माजी आमदाराचा चाले खेळ दिवसा ढवळ्या राजकारण करून करतायंत जनतेची फसवणूक, राजकारण करणाऱ्यांनो गेल्या वर्षी सामाजिक संघटनानी केलेल्या कामाचा आदर्श घेऊन सामाजिक काम करा.

 सध्या कोरोनाचा वनवा पेटला आहे याला कारणीभूत, राज्यकर्तेच आहेत. कारण कोरोनाने पॉझिटिव्ह  झालेल्या नागरिकांना दिलासा द्या, असे काही घाबरट नागरिक आहेत कि, नेत्यांच्या बातम्या चढावढीच्या  बातम्या ऐकूनच कोरोनाला गंभीर स्वरुप देऊन लोकांना जास्त घाबरतात. कोरोनावर मात करायची असेल तर, घरोघरी जाऊन राज्यकर्त्यांनी व जास्त नेत्यांचा पुळका, असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करून त्यांना मास्क, सिनिटायजर, हात धुवण्यास साबण असे साहित्य प्रतिनिधींनी  देऊन नागरिकांना शासनाचा नियम अटीच पालन करण्यास सांगुन, त्याना दिलासा दिला पाहिजे. असे न करता, त्यांना घाबरून टाकतात. कारण‌ एखादा व्यक्ति पॉझिटिव्ह निघाल्यावर घरच्यांची टेस्ट करण्यासाठी बळजबरी करताना दिसत आहेत.

कारण हे काम प्रशासन व्यवस्थितपणे सांगुन धीर देऊन मनाचा उत्साह वाढवून करायला सांगतात. त्यामुळे शेजारी सुध्दा, आपोआपच तपासणी करून घेतात. आणि ज्यांना श्रेय लाटायचे आहे. ते काय करतात, बातम्या वर बातम्या देऊन लोकांना घाबरून टाकतात, सध्या कारोनाचे नाव पुढे करून, श्रेय कोणी घेण्याचे यावर आजी माजी मध्ये कलगी तुरा रंगला आहे, यावर आजी माजी नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच एकमेकांवर श्रेय घेण्यावरून प्रसिध्दी माध्यमावर जोर दिला आहे. अशी न शोभणारी कामे करण्यापेक्षा, गेल्या वर्षी ‌सामाजिक संघटनेच्या‌ नेत्यांनी व कार्यकर्त्यानी  मदतीचा हात दिला होता, याचा आदर्श घ्यावा.

  गेल्या मार्च ते नोव्हेंबर पर्यंत शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे हे सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करत होते, त्यांच्या कडे  कोणतेही राजकीय बळ नसताना, किंवा कोणताही उद्योग व्यवसाय नसताना, हातावर पोट भरणाऱ्या कामगार मजुरांना किराणा मालाचे किट, रोगप्रतिकार शक्ती वरील गोळ्या करमाळा शहरासहित ग्रामीण भागात १५०० ते २००० किराणा मालाचे किट‌ कार्यकर्त्याच्या माध्यमातून घरोघरी जाऊन वाटप केले होते. काही ठिकाणी धान्यही वाटप केले होते. त्याच पद्धतीने जेऊर गावातील सामाजिक कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष नितीन खटके यांनी सुध्दा जेऊर मधील पुरग्रस्ताना व सर्व सामान्य माणसाना किराणा मालाचे किट व धान्य वाटप केले होते.

 त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे यांनी देखील किराणा मालाचे किट व मास्क वाटप केले होते. आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते नागेशजी कांबळे यांनी सुध्दा शिव भोजन थाळीला मदत केली होती. आणि त्याच पद्धतीने अनेक‌ सामाजिक कार्यकर्ते यांनी आपआपल्या पद्धतीने काम केले आहे. तोच आदर्श सध्या कोरोनावर राजकारण करून श्रेय घेणाऱ्यानी व प्रसिध्दिसाठी पुढे येणाऱ्या नेतेमंडळी, आणि फूकटचे श्रेय लाटणाऱ्यानी शासन करत असलेल्या सुख सुविधाचे श्रेय घेऊ नये. शासनाचे काम शासन करत आहे. मग फुकटच श्रेय घेऊ नये. उलट तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आजी माजी आमदार व प्रस्थापित नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगक यांनी गेल्या वर्षी इतर संघटनांनी केलेल्या  कामाचा आदर्श घ्यावा.

जर तसे जमत नसेल तर, शासनाचा फुकटचा माल अजुन रेशन दुकानदारांनी कोरोनामुळे वाटप केला नाही. तो‌ माल घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वाटप करावा. जर तेही जमत नसेल तर, पुढाकार घेणाऱ्या संघटनांना काम द्यावे. असे नाही केले तर लोक कोरोनामुळे नाही भुकेने मरतील. आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेसाठी मदतीचा हात शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी द्यावा.  यामध्ये संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष नितीन खटके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे ज्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी काम केले आहे. या सर्वांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून मदतीचा हात द्यावा. असे आवाहन भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments