कोल्हापूर/प्रतिनिधी:
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येतात. मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत. तसेच हलकट, बावळट, नेभळट, प्रवृत्तीच्या लोकांना कोरोना होतो तो मानसिक आजार असल्याचाही अजब दावा भिंडेंनी केला आहे.
कोरोनाच्या बाबतीत देशात खेळखंडोबा चालू आहे, जे जगायचे ते जगातील जे मरायचे ते मरतील, असं असंवेदनशील वक्तव्य त्यांनी केलं. तसंच मिलिट्रीला आपण काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का? असा सवाल त्यांनी विचारला.
संभाजी भिडे म्हणाले की, "समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. मात्र शासन हे दुशासन होता कामा नये, निव्वळ मूर्खपणा सुरु आहे. शासनाचे निर्णय घातकी आहेत. संसार आणि व्यापारी माती मोल झाले.लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही असेही भिडें म्हणाले आहेत.
याधीही वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते, आंब्यापासून मूल होतात अशी आक्षेपार्ह वक्तव्य भिडेंनी केली होती.
0 Comments