मुंबई : राज्यात 'एक देश एक शिधापत्रिका' योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करुन धान्याचं वाटप केलं जातं.
शिधापत्रिकांवरील १२ अंकी क्रमांकाचा वापर करुन लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरणाद्वारे धान्य वितरित केलं जातं. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ९४ लाख ५६ हजार शिधापत्रिकाधारकांनी जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे धान्याचा लाभ घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 Comments