पंढरपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाक्युद्ध संपत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीचं वारं वाहू लागलं असल्याने राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी “अजित पवार यांचं बोलणं टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं आहे” अशा शब्दात अजित पवारांवर टीका केली आहे.
गुरुवारी आयोजित कासेगावच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका करत, “तुमच्याकडे एक नेता जोरदार भाषण करत फिरतोय, त्याचं डिपॉझिटसुद्धा त्याला बारामतीमध्ये त्याला वाचवता आलं नव्हतं आणि हा कोणाच्या तोंडाने मत मागतोय?” असं म्हणत गोपीचंद पडळकर यांना चिमटा काढला होता.
गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत त्यांचं बोलणं टग्यासारखं आहे आणि रडणं बाईसारखं आहे अशा शब्दात मंगळवेढा येथे आयोजित एका सभेत सडकून टीका केली आहे. या सर्व प्रकरणात आता अजित पवार नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0 Comments