कोण असावा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? पाहा बंगालमधील जनतेनं कोणाला दिली पसंती


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार  भाजपचे दावे काही प्रमाणात खरे ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये  भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. एक्झिट पोल खरा ठरल्यास ममता बॅनर्जींसाठी हा मोठा झटका असणार आहे.

चर्चा जर मुख्यमंत्रीपदाबाबत करायची झाली, तर ममता बॅनर्जी अजूनही बंगालमधील जनतेची पहिली पसंत आहेत. त्यांच्यासमोर दूरपर्यंत कोणताही नेता दिसत नाही. एक्झिट पोलनुसार, मुख्यमंत्री म्हणून ४३ टक्के लोकांची पसंती ममता बॅनर्जींनाच आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला किती पसंत -

ममता बॅनर्जी- ४३%
दिलीप घोष- ६%
भाजपमधील कोणीही - २६%
TMC मधील कोणीही - १%
शुभेंदु अधिकारी - ५%
मिथुन चक्रवर्ती- ४%
बाबुल सुप्रियो- १%
मुकुल रॉय- १%
लेफ्ट फ्रंटमधील कोणीही - ५%
अब्बास सिद्दीकी - १%
अधीर रंजन चौधरी - १%
काँग्रेसमधील कोणीही - १%
सूर्यकांत मिश्रा - १%
बुद्धदेव भट्टाचार्जी - १%
माहिती नाही किंवा अन्य - १%
या एक्झिट पोलनुसार (election exit poll), मुख्यमंत्रीपदासाठी बंगालमधील जनतेची पसंती अजूनही ममता बॅनर्जी यांनाच आहे. ममता बॅनर्जी गेल्या दहा वर्षापासून बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेस भाजपमुळे अडचणीत असल्याचं चित्र असतानाच दुसरीकडे ममता बॅनर्जींचा दबदबा मात्र कायम आहे.

ममता बॅनर्जींनंतर भाजपचे (political party) प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली आहे. ६ % लोक त्यांना मुख्यमंत्री पदावर पाहू इच्छितात. तर, शुभेंदु अधिकारी यांच्याशिवाय मिथुन चक्रवर्ती आणि बाबुल सुप्रियो यांच्यासारखे भाजपचे मुख्य चेहरेही या शर्यतीत बरेच मागे असल्याचं चित्र आहे. तर, भाजपमधील कोणताही चेहरा चालेल याला २६ % टक्के लोकांची पसंती आहे.

याचाच अर्थ बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यास केंद्रीय नेतृत्वाकडून निवडण्यात आलेला कोणताही नेता बंगालमधील जनतेला मुख्यमंत्री (CM) म्हणून स्वीकार असले. बंगालमध्ये भाजपनं अजून कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलेलं नाही. टीएमसीनं वारंवार हा मुद्दा काढला असला तरीही भाजपनं अद्याप याबाबतची घोषणा केलेली नाही.

Post a Comment

0 Comments