‘शाहरुखने माझे आयुष्य उध्वस्त केले’, तरुणीने केला आरोप


बॉलिवूडचा बादशहा, किंग खान या नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. एकेकाळी त्याचे चित्रपट सुपरहिट ठरत होते. ‘राहुल…नाम तो सुना होगा’ हे वाक्य गेल्या २५ वर्षांपासून विविध प्रकारे विविध कलाकारांनी सादर केलं. पण, शाहरुख खानने ज्या अंदाजात हा संवाद म्हणत अभिनेत्रींना घायाळ केलं त्याची बात काही औरच. शाहरुख  लाखो तरुणींच्या मनावर राज्य करत होता. पण आता एका तरुणीने शाहरुखने तिचे आयुष्य उध्वस्त केल्याचा आरोप केला आहे.

ह्यूमन्स ऑफ बॉम्बने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  एका जोडप्याची गोष्ट शेअर केली आहे. ही गोष्ट सांगताना सुरुवातीला तरुणीने ‘शाहरुख खानने माझे आयुष्य उध्वस्त केले’ असे म्हटले आहे. लहानपणापासून शाहरुखचे चित्रपट पाहून खऱ्या आयुष्यातही कोणी तरी शाहरुख सारखे प्रपोज करावे असे एका तरुणीला वाटत होते. पण असे न झाल्यामुळे तिने शाहरुखवर आरोप केले आहेत.


‘शाहरुखने  माझे आयुष्य उध्वस्त केले. लहानपणापासून माझे स्वप्न होते की माझ्या परफेक्ट मॅनने मला अतिशय खास पद्धतीने प्रपोज करावे. बॅकग्राऊंडमध्ये वॉयलिन वाजत आहेत, तो माझ्याकडे हळूहळू चालत येत आहे, तो गुडघ्यावर बसेल आणि त्याच्या हातातील अंगठी मला घालेल. पण असे कधी झालेच नाही’ असे त्या तरुणीने म्हटले. 

पुढे ती म्हणाली, ‘खरं तर आम्ही खूप मोठ्या अडचणीत सापडलो होतो. मी माझ्या बंगाली कुटुंबीयांना मला पंजाबी मुलाशी लग्न करायचे आहे यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही तीन वर्षे एकमेकांना डेट करत होतो. पण त्यातला बराच वेळ हा दोघांच्या पालकांना एकत्र आणण्यात गेला. आम्ही ठरवले होते काहीही झाले तरी आपण लग्न कराचे. त्यामुळे मला सरप्राइज देऊन कधीच प्रपोज करण्याचा प्रयत्न नाही केला. मला हवा असलेला तो फिल्मी क्षण माझ्या आयुष्यात येणार नसल्याचे मला जाणावले होते. मग मी एक सरप्राईज पार्टी अरेंज केली.’

‘आम्ही पहिल्यांदा डेटसाठी ज्या हॉटेलमध्ये भेटलो होतो तेथेच ती अरेंज केली होती. तो जेव्हा आत आला तेव्हा मॅरी मी हे गाणे लावण्यास सांगितले आणि मी गुडघ्यावर बसले. त्याला विचारलं तू माझ्याशी लग्न करशील का?’ असे ती पुढे म्हणाली.

Post a Comment

0 Comments