प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त हेरले येथे रक्तदान शिबीर नियोजनाचे आव्हान माजी आमदार मा.राजीव आवळे साहेबांनी केले होते. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर उत्तम नियोजन करून रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडले.
माजी आमदार राजीव आवळे हे नेहमीच सामाजिक कार्यात जातीने सहभागी असतात.मुळात फुले,शाहू, आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित होऊन सर्वसामान्यांसाठी कार्य करणे व तत्पर राहणे ही त्यांची सामाजिक हातोटी होती. त्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी प्रचंड कामाचा धडाका लावला होता. स्वतः आमदार असताना स्वतःच्या विधानसभा क्षेत्रात त्यांनी केलेले काम आजही लक्षात ठेवण्यासारखे व उल्लेखनीय आहे. आमदार म्हणून त्यांनी कधीही मिजास न दाखवता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे व त्यांच्यासाठी कार्यतत्पर राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
मात्र यावेळी त्यांनी कोरोना महामारीत रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्ताचा पुरवठा व्हावा व ग्राम विकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
नामदार हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य व विशेषता कोल्हापूर जिल्ह्यासाठी आमदार व मंत्री म्हणून केलेलं काम प्रत्येक घटकासाठी उपयोगाचे आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाला सलाम व त्यांच्या प्रेमापोटी रक्तदान शिबिराचे आयोजन करून स्वतः रक्तदान केले. माजी आमदार राजीव आवळे यांनी केलेले रक्तदान इतरांना प्रेरणादायी व कोरोना काळात इतर मंत्री,आमदार व स्थानिक पुढाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्या सारखे आहे.
सदर शिबिरात जवळपास १२० रक्तदात्यांनी रक्तदानाचे मानवतावादी कार्य केले.विद्यमान कोविड परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत कार्यक्रम राबविण्यात आला.या प्रसंगी तालुका अध्यक्ष डी. बी.पिस्टे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. शरद अलमान,आविष्कार फौंडेशनचे शिरोळ तालुका अध्यक्ष विनायक मगदूम,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष संभाजी पवार साहेब, संयोजक अरुण कारंडे व श्रेणिक चौगुले मा.सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोल्हापूर अल्पसंख्याक सेल हे उपस्थित होते. आयोजकांनी कोरोना काळात रक्तदान शिबिराचे आयोजन करून इतर घटकांना प्रेरणा दिली त्यामुळे आयोजकांचे सर्वत्र त कौतुक होत आहे.
0 Comments