बंगळुरू: एका मॉडेलवर तिचा बॉय फ्रेंड व त्याच्या मित्राने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. रसामध्ये नशेचे औषध मिसळून हे कृत्य करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
फेसबुकच्या माध्यमातून नंबर मिळून तो सतत तिच्याशी बोलायचा. अशा प्रकारे ते प्रेमात पडले होते. प्रमोदने त्या युवतीला तिच्याशी बोलायचे आहे असे सांगून यशवंतपुरा येथील लॉजमध्ये बोलावले. त्यानंतर त्याने तिला नशेचे औषध मिसळलेला रस पाजला. त्यानंतर प्रमोद आमि त्याचा मित्र धनंजय याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या युवतीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आला. त्यानंतर त्यांनी अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरुन प्रसारित करण्याची धमकी दिली. अशा पध्दतीने पीडितेला धमकावून १८ वेळा लैंगिक अत्याचार केले गेले. एका युवतीने यशवंतपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस आता आरोपी प्रमोद आणि धनंजय याला पकडण्यासाठी सापळा रचत आहेत.
0 Comments