उद्धवा...नतद्रष्टांनी, तुझ्याविरोधात छुपी मोहीम सुरू केलीय; अभिनेता किरण माने यांची पोस्ट



करोनामुळं देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाचं हे संकट शक्य तितक्या लवकर दूर करण्यासाठी अवघा देश एकत्र आला असताना राजकारणी मंडळी याला अपवाद ठरत आहेत. अशा परिस्थितीतही एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत.


उद्धवा...
सतत सांगतोस,
...'मला या संकटप्रसंगी राजकारण नकोय'
तरीही काही नतद्रष्टांनी,
 तुझ्याविरोधात छुपी मोहीम सुरू केलीय.
खरंतर तू म्हणालास तसं, 
'राजकारण खेळायला आयुष्य पडलंय'
पण मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात
हे ऐकणार नाही !

तू लढत रहा वाघा.. आमचा तुझ्यावर विश्वास आहे !

तू आमच्या हतबलतेचा फायदा घेऊन
कृतज्ञतेच्या नांवाखाली
रस्त्यावर आणून भरकटवलं नाहीस !
...या अत्यंत भयावह परीस्थितीमध्ये
आमच्या मनातल्या भितीला 'हेरून'
 आम्हाला पोकळ एकतेचं गाजर दाखवून
एकमेकांत 'आग' लावण्याचं राजकारण खेळला नाहीस !!

महाभयंकर विषाणूनं जगभर थैमान घातलेलं असताना..
प्रत्येकानं घरात शांत बसून, सोशल डिस्टन्स ठेवून,
आपला जीव वाचवण्याची गरज असताना...
 हिंस्त्र गिधाडासारखं "रस्त्यावर या..गच्चीत या.." 
असं क्रूर आवाहन-आव्हान काहीच केलं नाहीस.

"तुम्ही खबरदारी घ्या... मी जबाबदारी घेतो !" 
हे वाक्य तू 'आतून' - मनाच्या तळातून - उद्गारलंस...
आणि आमच्या डोळ्यांत पाणी तरळलं..
तू फक्त दिलासा दे.. आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत !
तू तुझी जबाबदारी पार पाड.. 
आम्ही खबरदारीसाठी वचनबद्ध आहोत !!

उद्धवा... माझ्या राजा... बाळासाहेबांच्या बछड्या..
तू लढ...आम्ही तुझ्या पाठीशी आहोत !!!

- किरण माने.

Post a Comment

0 Comments