आईच्या मृतदेहाजवळ बाळ २ दिवसापासून रडतंय हे शेजारी ऐकत होते, शेवटी ''ती'' माय धावून आली


पिंपरी-चिंचवडमधून एक हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. आईच्या मृत्यू (Death) देहाजवळ एक दीड वर्षांची मूल रडंत बसलं होतं. आपल्या आईला काय झालं? मी कुठे आहे? याबाबतीत कोणतीही कल्पना नसणारे मुल आईविना क्षणात पोरकं झालं. आपल्या आईला काय झालं आहे? हे समजण्या इतके ते मुलं मोठं नाही. ते तसचं तिथे रडंत, भुकेने कळवळत, कोणत्याही आश्रया विना बसलं होतं. तरी कोणालाही त्याचं बद्दलं वाईट वाटलं नाही. कोणीही त्याच्या जवळ आले नाही. काय ही माणसाची लाचारी?

कुठे गेली लोकांमधली माणूसकी? किती ही असंवेदनशीलता?  ही घटना एक उदाहरण आहे, ज्यामुळे लोकांच्या हृदयात देखील कोरोना झाल्याचे दिसत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या दिघी परिसरातून ही हृदय पिळवटून (Twisting heart) टाकणारी बातमी समोर आली आहे. सरस्वती राजेश कुमार असे मृत महिलेचे नाव आहे. मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेल्या सरस्वती राजेश कुमार यांचे पती गावी गेले होते. सरस्वती आणि तिचे दीड वर्षाचे मूल घरात दोघेच राहत होते. तेव्हा अचानक सरस्वती राजेश कुमार यांचा मृत्यू झाला. दुर्दैव असं की, त्या वेळेस घरी कोणी नव्हते.

दीड वर्षाचे हे मूल आईच्या शरीरावर खेळत राहिले, ते कधी तहानेने रडते, तर कधी भूकेने. दोन दिवस मूल असेच बसून. जवळपासच्या लोकांना हे समजले, पण कोणीही मुलाला घ्यायला तयार नव्हतं.

शेवटी ''खाकी''तली माय धावून आली

कोरोनामुळे त्या महिलेचा मृत्यू (Death) झाला आहे, त्यामुळे आसपासचे लोक जवळ जाण्यास घाबरत होते . त्यामुळेच लोक महिलेजवळ बसलेल्या मुलाले देखील घेण्यास घाबरू लागले. अखेर दोन दिवसानंतर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुशीला गबाळे आणि रेखा वाजे या दोन महिला पोलिसांनी मुलाला आपल्या मांडीवर घेतले. त्याला दूध आणि बिस्किटे भरवले. यानंतर मुलाला शिशुगृहात (nursery) दाखल करण्यात आले. ते मुल आता पूर्णपणे ठिक आहे. पण महिलेचा पती अद्याप गावावरुन आलेला नाही.

Post a Comment

0 Comments