सदर दुर्दैवी घटनेमुळे नांदेडमदील हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वतःच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या नवरदेवाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात नवरदेवाचा मृत्यू झाला. मृत झालेल्या नवरदेवाचं नाव उत्तम आहे. अवघ्या २५ वर्षाचा असलेला हा तरुण आपल्या लग्नाची पत्रिका नातेवाईकांना देण्यासाठी नांदेडला मोटर साईकल वरुन गेलेला. मात्र रात्र झाली तरी परत न आल्याकारणाने त्याच्या घरातल्यांनी त्याचा शोध चालू केला.
दुसऱ्या दिवशी पाहटे भोकर फाट्याजवळ एका वाहानाने तरुणाला धडक दिल्यामुळे त्या तरुणाचा अपघात झाल्याची घटना समोर आली. ही माहिती समोर येताच बारड येथील महामार्ग सुरक्षा पथकाने पाहणी केली. तपास केल्यानंतर तो तरुण उत्तम असल्याच समोर आलं. दरम्यान, धडक दिलेल्या गाडीची माहिती अद्दाप समोर आलेली नाही. मात्र उत्तम च्या भावाने या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला आहे. या कारणामुळे आता अज्ञात गाडीचा शोध लावण्याचं मोठं आव्हान आर्धापूर पोलिसांसमोर आहे.
0 Comments