"गरीब कुटुंबातील उच्च शिक्षीत मुलांनी जपले माणुसकीचे नाते : आई वृद्धाश्रमास केली मदत"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

समाजात बरेचदा असा अनुभव येतो की, जे आईबाप आपल्याला लहानाचं मोठं करतात. या समाजात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या जिवाचं रान करून स्वतः उपाशी राहून बऱ्याच गोष्टींचा त्याग करून मुलांच्या भविष्यासाठी व कल्याणासाठी अहोरात्र कार्यमग्न असतात. त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तीच मुले आपली प्रायव्हसी व जॉब अशी कारणे देऊन आपल्या वृध्द आई वडिलांना  वृद्धाश्रमात पाठवितात यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असेल असे वाटत नाही.
         
आई या एका वृद्धाश्रमास गरीब कुटुंबातील उच्चशिक्षित ५ मित्रांनी मिळून भेट दिली असता असे लक्षात आले की, ते वृध्दाश्रम चालवणारी  व्यक्ती ही एक  सर्वसामान्य असून  कोणत्याही शासकीय मदतीशिवाय गेले ४ वर्ष श्री .संजय भोसले हे आपल्या कुटुंबीयांसह अशा निराधार वृद्धांचा सांभाळ आपल्या कुटुंबातील आई वडिलांसारखी त्यांची सेवा करण्याचे कार्य करीत आहेत . 
      
  सध्याच्या कोरोना संकटकाळात व कोरोनाच्या साथीपासून बचाव करण्यासाठी आणि जगण्यासाठी म्हणून अन्न ,वस्त्र ,निवारा व आरोग्य याची सोय ते लोकवर्गणीतून करतात. पण सद्य स्थितीत आश्रमाची अवस्था खूप बिकट झालेली आहे.मात्र त्या संवेदनशील मुलांनी या कोरोना महामारीच्या काळात वृद्धाश्रमला भेट दिली असता असे समजले की, त्या वृद्धाश्रमात १८ निराधार वयोवृद्ध महिला वास्तव्यास असून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था होण्यासाठी ही अन्नधान्य त्या आश्रमात उपलब्ध नाही.लोकांकडून मिळणारे धान्य व इतर  वस्तू जवळ जवळ संपलेल्या आहेत हे लक्षात येताच या मुलांनी  महिनाभर पुरेल इतके साहित्य देऊन छोटीशी मदत केली आहे.
       
 खरं म्हणजे या मुलांनी नुकतीच एम.ए.ची पदवी संपादन करून स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी तुटपुंजा पगारावर काम करीत आहेत.मात्र स्वतः आर्थिक विवंचनेत असूनही स्वतःच्या दुःखापेक्षा त्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे पोटाची व्यवस्था करता यावी या प्रामाणिक व उदात्त हेतूने त्यांनी त्यांना मदत केली.खरंच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर असे असंख्य लोक जगण्यासाठी धडपडत आहेत मात्र आर्थिक गरीबीत जगणार्‍या या मुलांनी मनाचा मोठेपणा व श्रीमंती दाखवत संवेदनशीलतेच्या भावनेतून त्यांनी केलेली  मदत श्रीमंतांच्या दृष्टीने कमी असली तरी  गरिबांच्या व  त्या वृद्धांच्यादृष्टीने लाख मोलाची आहे असेच म्हणावे लागेल. तसेच त्या मुलांचे सर्वोत्तम वैशिष्ट्य म्हणजे या मदतीचा व आमच्या नावांचा उल्लेख कुठेही करू नये याबाबत त्यांनी विनंती केली होती. त्यामुळे त्यांच्या  नामोल्लेख केला नाही.
        
 आई वृद्धाश्रमाच्या जाहीर आव्हानानुसार आपण दानशूर लोकांनी व संवेदनशील व्यक्तींनी वृद्धाश्रमाला मदत करावी अशी नम्र विनंती आहे. आई नामक या वृद्धाश्रमाची अवस्था अत्यंत बिकट असून सध्या ते भाडेतत्त्वावर शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात 'सावरिया' या हॉटेल लगतच्या इमारतीत हे वृद्धाश्रम चालविले जात आहे. आपण कोणत्याही प्रकारची मदत या वृद्धाश्रमास करू शकता आणि या वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकता.

Post a Comment

0 Comments