-ओंकार बजागे
'ऑक्सिजन अभावी २२ जणांचा मृत्यू'-नाशिक
'रुग्णालयात लागलेल्या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू'-विरार
'बेड अभावी वृद्धाचा हॉस्पिटल बाहेर झाडाखाली मृत्यू'- पुणे
'बेड अभावी पत्नीच्या समोर पतीने पायरीवर सोडले प्राण '-चांदवड,नाशिक
गेल्या काही दिवसातील सध्या चे वास्तव अधोरिखीत करणाऱ्या या काही निवडक बातम्या ऐकल्या की मन सुन्न होत. माणसाला त्याच्या खुजेपणाची जाणीव करून देणाऱ्या ,न पेक्षा, त्याची घमेंड उतरवण्यासाठी पुरेशा म्हणता येतील. पण निरपराध माणसांचा बळी जाणे ही बाब मनाला अधिक दुःख देणारी आणि त्यायोगे न पटणारी ही. आपल्या यंत्रणेचे अपयश अधोरेखित करणारी.
पूर्वी कुणीतरी मृत पावलं तर लोक (बऱ्याचदा गमतीने) म्हणायचे,"त्याच्या/तिच्या पापाच्या घडा भरला असावा, म्हणून असं झालं". पण मरणाची ही अट अलीकडे कदाचित (काळाने)रद्द केली असावी. ऑक्सिजन अभावी नवजात बालकांचाही मृत्यू होताना आपण पाहिला. घराची ओढ लागलेल्या , थकल्या- भागल्या जीवाला विसाव्यासाठी थांबल्यावर एखादी रेल्वे चिरडून जाताना आपण पाहिली. आधीच ज्यांच्या दारी यम आ वासून उभा होता, त्या ICU मधल्या जीवांनाही आगीत भस्मसात होताना आपण पाहिलं. परिस्थिती बद्दल गंभीर भाष्य करणाऱ्या या घटना. स्वस्त मरणाचे दाखले देणाऱ्या. शहाण्यास सावधान होण्यास सांगू पाहणाऱ्या.
पण माणूस यातून फार काही शिकला अस क्वचितच पाहायला मिळालं. मागच्या वर्षी लॉकडाऊन मुळे बेजार झालेल्या जनतेला जस पुन्हा लॉकडाऊन नको होतं तसं त्यांना नियमांचं पालन ही नको होतं. त्यामुळे त्या नकोशा पाहुण्याला पुन्हा यायला फावलं. लस नव्हती तेव्हा फुकाच्या चर्चा रंगत होत्या.' शास्त्रज्ञ कुठे आहेत?, लस कधी येणार?सर्वाना कधी मिळणार?' हे व असे अनेक . पण लस आली नि नसत्या अफवाना उधाण आलं.मग लोकांना लस घेण्याकरिता प्रवृत्त करण्यासाठी अगदी हात धरून घरातून बाहेर काढायला लागणे प्रशासनाचा घटक या नात्याने प्रत्यक्ष अनुभवता आलं. गेल्या एक दीड वर्षात आपल्याला कोरोना झाला नाही म्हणजे आपल्याला कधीच होऊ शकत नाही अशीच जणू काही लोकांची समजूत झाली. आणि मग वरील बातम्या कानी पडू लागल्या.
एखादी गोष्ट व्हावी की होऊ नये,अशी केवळ ईच्छा व्यक्त करून चालत नाही.त्यासाठी काही किमान प्रयत्न करणे आवश्यक असते.आपण नेमकं तेच विसरलो. आपल्याला कोरोना नको होता, लॉक डाऊन नको होतं पण त्यासाठीच्या किमान नियमांचं पालन आपण विसरलो. सरकारी यंत्रणेच अपयश ही दुर्लक्षित करता येण्यासारखं नसलं तरी नागरिक म्हणून आपणही काही मोठा तीर मारला नाही.
मला वाटतं परिस्थिती ची जाणीव येण्याकरिता इतकं पुरेसं असावा.स्वस्त मरणाचा दाखला आपल्या कुणाच्या नशिबी येऊ नये हीच सदिच्छा!
लोकहो, काळजी घ्या.
0 Comments