उजनी धरणातील सोलापूरच्या थेंबजरी हक्काचं पाणी पळवलं असेल तर राजकीय संन्यास घेईन - पालकमंत्री दत्तात्रय भरणे


सोलापूर/प्रतिनिधी:

उजनी धरणामधून इंदापूर तालुक्याला ५ टीएमसी पाणी दिल्याच्या कारणावरून सोलापुरातील राजकारण पेटले आहे. पालकमंत्र्यांवर विविध स्तरावरून टीका होत आहे. त्यावर प्रतिउत्तर देताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, जर मी सोलापूरकरांच्या हक्काचं पाणी माझ्या मतदारसंघात घेऊन गेलो असेल तर मी मंत्रीपद, आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन. 

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याची परवानगी राज्यशासनाने दिली आहे. इंदापूर तालुक्याचे आमदार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना शेतीसाठी पाण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांकडे केली होती. ही मागणी मान्य करून राज्य शासनाने उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडण्याची परवानगी दिली आहे. 

तसेच सोलापूरच्या हक्काचे पाणी मी एक थेंब देखील घेतले नाही. विरोधकांनी मी सोलापूरच्या हक्काचे पाणी घेतले असेल, हे सिद्ध केल्यास मी मंत्रीपदाचा, आमदारकीचा राजीनामा देईन, असे पालकमंत्र्यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. मी राजकीय संन्यास घेईन, सिद्ध करा असेही त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments