पंढरपूर येथे मल्टिप्लेक्स बंद करून युवा उद्योजकाने उभारणे कोविड हॉस्पिटल


पंढरपूर/प्रतिनिधी:

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट थैमान उठवले आहे. जिल्ह्यात रोज हजारो कोरोना रुग्ण आढळत आहे. जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर व हॉस्पिटल पुढे झाले आहेत. त्याच पंढरपूर येथील युवा उद्योजक अभिजित पाटील यांनी स्वतःचे पंढरपूर येथील मल्टीप्लेक्स असणारे दोन मजली थेटर कोरोना ग्रस्तांच्या कोविड हॉस्पिटल साठी दिली आहे. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पाटील यांनी स्वखर्चाने अत्याधुनिक अशा ५० बेडचे कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. कोरोना ग्रस्तांच्या सेवेसाठी येत्या दोन दिवसात हॉस्पिटल खुले होणार आहे.

मल्टिप्लेक्स थेटर बंद करून कोविड हॉस्पिटल उभारले..

सोलापूर जिल्ह्यात रोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनातील आरोग्य यंत्रणेवर यामुळे अधिक ताण पडत आहे. काही रुग्णांना उपचारा अभावी मृत्यु पत्करावा लागत आहे. त्यातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीनंतर मतदारसंघांमध्ये कोरोनाचा आकडा हजारांच्या घरात गेला आहे. पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी मल्टिप्लेक्स थेटर बंद करून कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी हॉस्पिटल तयार केले आहे. पंढरपूर येथील सामान्य कुटुंब व गरीब नागरिकांना माफक दरात उपचार मिळावे या हेतूने त्यांनी या कोविड हॉस्पिटलची उभारणी केली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये हे हॉस्पिटल रुग्णांसाठी खुले होणार आहे.

अत्याधुनिक कोविड हॉस्पिटलची उभारणी

पंढरपूर येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून नवीन हॉस्पिटल उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.  पंढरपूरच्या मातीतील उद्योजक अभिजीत पाटील हे स्वखर्चाने हॉस्पिटलची निर्मिती केली आहे.. त्यांनी स्वतःच्या मल्टिप्लेक्समध्ये ५० बेडचे अत्याधुनिक असणारेेेे कोविड हॉस्पिटल  उभे केले. त्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपकरणे, कोरोना वरील औषधे, प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे प्रशिक्षित केले गेले आहे. सोयीयुक्त पहिल्या टप्प्यातील ५० बेड तयार करण्यात आले असून. त्यानंतर गरज भासल्यास बेडची संख्या वाढवण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. 

ऑक्‍सिजनचा पायलट प्रोजेक्ट सुरू

उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याच्या वतीने ऑक्सीजनचा पायलट प्रोजेक्ट उभारण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पुढाकार घेतला.  तसेच विठ्ठल मंदिर समितीच्या वेदांत आणि व्हिडीओकॉन या दोन भक्त निवास मध्ये २०० बेडचे कोविद केअर सेंटर सुरु करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. अशा विविध सामाजिक कामात आपली जबाबदारी उद्योजक अभिजीत पाटील पार पाडत आहे.

Post a Comment

0 Comments