सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली


 देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. कित्येक राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. शाळा कॉलेज बंद करण्यात आली आहेत. दरम्यान ,CBSE बोर्डानं परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. बोर्डानं दहावीची परीक्षा रद्द केली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

आज दुपारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसई परीक्षांसंदर्भात घोषणा केली. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती. काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. 

Post a Comment

0 Comments