सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर जिल्ह्याने आतापर्यंतचे कोरोनाने मृत्यूचे रेकॉर्डब्रेक केले. दिवसभरात शहर व जिल्ह्यात एकूण ३० जणांचे बळी गेले. गुरुवारी सोलापुरात कोरोना बळीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी दक्षता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत एका दिवसात २९ जणांचा बळी गेला होता. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती भयावह झाली आहे. दिवसात नव्याने १ हजार ७३ रुग्णांची भर पडली आहे.तर १ हजार २ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आणखी ३८६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील ४७ हजार २२५, तर शहरातील १६ हजार २३३, असे एकूण ६३ हजार ४५८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
0 Comments