स्कॉटलँड :दिवसेंदिवस लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार उघडकीस येत आहेत. तीन मुलांची आई असलेल्या एका महिलेने चक्क अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार केल्याने तिला तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. सोफी हिंदमार्च असे त्या महिलेचे नाव असून तिने तिला अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
स्कॉटलँडमधील पेनिर्थ येथे राहणारी २७ वर्षीय सोफीचे तिच्या आसपासच राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवायची. तिची मुलं शाळेसाठी घराबाहेर जायची तेव्हा ती त्या मुलाला तिच्या घरी बोलवायची. अशा प्रकारे त्या मुलामध्ये व महिलेमध्ये १३ ते १४ वेळा संबंध आले होते. त्यात त्यांनी एकदा त्याचे खासगी क्षण सोफीच्या मोबाईलवर रेकॉर्डही केले होते.
दरम्यान मुलाच्या वडिलांनी त्याच्या मोबाईलमधील हे फोटो व व्हिडीओ पाहिले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी हा प्रकार पोलिसांना कळवला व महिलेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर सोफीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला तुरुंगवास ठोठावला आहे
0 Comments