बार्शी! कत्तलखान्याकडे चालविलेल्या सात गाईची सुटका ; २ आरोपीवर बार्शी तालुका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

दिनांक ०६ रोजी पहाटेच्या सुमारास कुर्डूवाडी बार्शी रोड वरून बोलोरो पिकप गाडी मधून कत्तलीसाठी गाईची वाहतूक केली जाणार आहे, अशी माहिती प्राणीमित्र धन्यकुमार पटवा यांच्याकडून तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी शिवाजी जायपत्रे यांना मिळाली.

 त्यांनी पीएसआय सूर्यवंशी यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस कॉन्स्टेबल धनराज फत्तेपूरे, पोलीस कॉन्स्टेबल अंकु लवार, होमगार्ड शाहीर, होमगार्ड काळे, होमगार्ड पोकळे यांनी कारवाई करता आगळगाव चौक येथे वाहने चेक करत असता मिळालेल्या माहिती प्रमाणे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकप क्रमांक एम एच ४४ ए एफ ३८२२ समोरच्या बाजूला तरकारी लिहिलेला वरील पथकास आढळला त्याला थांबविण्याचा प्रयत्न करूनही न थांबल्यामुळे वरील पथकाने त्याचा पाठलाग करून जामगाव हद्दीमध्ये असलेल्या वारणा डेरी समोर पकडले.

 त्यामध्ये दोन खिल्लार गाई, एक खिल्लार खोंड, एक खिलार कालवड, जर्सी गाय तीन, एकूण १ लाख ७५ हजार रुपयाचे गोवंश अवैध वाहतूक करत, दाती वाटीत भरून त्यांना वेदना होईल अशा स्थितीत, त्यांना हालचाल न करता येईल, चारा पाणी व औषधाची कुठलीही सुविधा नसल्याने, त्या कत्तलीसाठी चालविल्याचा संशय आल्याने कलीम रफिक कुरेशी वय २४ वर्षे राहणार पापनस तालुका माढा जिल्हा सोलापूर व आफताब अकबर कुरेशी वय १९ वर्षे राहणार पापनास तालुका माढा जिल्हा सोलापूर, बोलोरो पिकप व गोवंशा सह बार्शी तालुका पोलीस स्टेशन च्या पथकाने ताब्यात घेऊन धडाडीची कामगिरी करत त्यांच्यावर बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments