दारूच्या तलफ भागवण्यासाठी चक्क सॅनिटायझरच प्राशन ; पाच जणांचा जागीच मृत्यू


यवतमाळ : 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनेक निर्बंधांसह लॉकडाऊन जाहीर केला आहे. यासह स्थानिक प्रशासनालाही तिथल्या परिस्थिती नुसार निर्बंध लावण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दारु विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र याच दारूसाठी यवतमाळमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दारूची तलफ भागवण्यासाठी काही जणांनी चक्क सॅनिटायझरचं प्राशन केलं.

 यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. हि घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी या गावात घडली आहे. लॉकडाउनमुळे दारूची दुकानं बंद असल्याने त्यांनी सॅनिटायझरच प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. या घटनेतील इतर तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी पाच मृतांची नावं आहेत.

Post a Comment

0 Comments