'आमचे आमदार वारले,’ मतदारसंघात न फिरकल्याने पोस्ट व्हायरल


 
दिवसेंदिवस कोणाचा प्रादुर्भाव वाढत आहे, सध्याच्या घडीला महाराष्ट्रात रुग्ण वाढीचा दरही जास्त आहे, सगळीकडे कोरोनाचं थैमान आहे. नागपूर मधील कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर हे मतदारसंघात फिरकलेच नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे आमदार हरवल्याची पोस्ट, सोशल मीडियावर फिरत आहे. संकटाच्यावेळी आमदारांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत, संतापलेल्या एका मतदाराने, आमदार सावरकर यांचं कोव्हिडमुळे निधन झाल्याची पोस्टही व्हायरल केली. याबाबत सावरकर यांनी वाठोडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

 समाजमाध्यमांतून पुढाऱ्यांना लक्ष्य करणे सुरू झाले आहे. अशाच प्रकारातून कामठीचे आमदार हरवल्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चक्क ‘निधन’ आणि ‘श्रद्धांजली’चीही पोस्ट व्हायरल करण्यात आल्याने नागरिकांत खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच आमदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली.

कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर हरवल्याची पोस्ट समाजमाध्यमांत व्हायरल करण्यात आली. याची चर्चा सुरू असतानाच एकाने त्यांचे ‘निधन’ झाल्यासह त्यांना ‘श्रद्धांजली’ वाहिल्याची पोस्ट व्हायरल केली. याबाबत आमदार सावरकर यांना कळताच त्यांनी लगेच वाठोडा पोलिस ठाणे गाठून या खोडसाळपणाबाबत तक्रार केली. पोस्ट टाकणारा प्रीतम व इतर दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार टेकचंद सावरकर यांनी तक्रारीत केली. ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया नाही. पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजप विरोधकांचा हा डाव असल्याचा दावा टेकचंद सावरकर यांनी केला.

Post a Comment

0 Comments