मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडलाय अर्जुन कपूर, कौतुक करत म्हणाला....


बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये (relationship) आहेत. आधी ते दोघेही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलत नव्हते, परंतु आता दोघेही एकमेकांबद्दल उघडपणे बोलतात. सोशल मीडियावर (social media) हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट (social media post) करत असतात. आता अलीकडेच एका मुलाखतीत अर्जुनने मलायकाचे तोंडभरून कौतुक केले आहे. मलायकाकडून आपल्याला दररोज काहीना काही शिकायला मिळत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

अर्जुन म्हणाला, ‘मलायका कशी दमदार आहे हे मला आवडते. तिचे आयुष्य जगण्याचा मार्ग खूपच प्रभावी आहे. तिने वयाच्या 20व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली आणि अजूनही ती काम करत आहे. ती एक स्वतंत्र स्त्री आहे आणि तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व आहे.’

 
अभिनेता पुढे म्हणाला, ‘मी कधीही तिला कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रार करताना पाहिले नाही. मी कधीही तिला नकारात्मक झालेले पाहिले नाही, किंवा तिच्या जीवनावर नकारात्मकपणा येऊ देखील दिला नाही. ती नेहमीच अभिमानाने जगते आणि प्रत्येकाला आपल्या कामातून उत्तर देते. मी दररोज तिच्याकडून काहीतरी शिकत आहे.’

मलायका त्याच्यासाठी का आहे खास?

काही दिवसांपूर्वी चाहत्यांनी अर्जुनला मलायकाबद्दल विचारले की, मलायका इतर लोकांपेक्षा वेगळी आहे, असे (social media) तुम्हाला वाटते का? तर अर्जुन म्हणाला होते, ‘जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही अशा प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाहीत. तसे, मलायकाची खास गोष्ट म्हणजे ती मला समजते आणि माझ्याबरोबर संयमाने सगळ्या गोष्टी  (social media post) हाताळते. जर माझ्यासारख्या व्यक्तीबरोबर जगणे कठीण असेल, तरीही ती माझ्यासोबत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे.’(Arjun Kapoor says Malaika Arora is a talented actress and I learn so much from her)

मलायकाशी लग्न कधी करणार?

मलायकासोबतच्या लग्नाबद्दल अर्जुनला विचारले असता त्याने उत्तर दिले की, ‘जेव्हा मी लग्न करेन तेव्हा मी तुम्हाला सर्व सांगेन. सध्या लग्नाची कोणतीही योजना नाही. जरी मी लग्नाची योजना आखत असेन, तरी कोरोनासारख्या समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना मी ते करणार नाही. आम्ही दोघांनी अद्याप लग्नाबद्दल विचार केलेला नाही. परंतु, मी असे म्हणेन की जेव्हा आम्ही लग्न करू, तेव्हा मी नक्कीच सर्वांना सांगेन. आम्हाला कोणापासूनही काही लपवायचे नाही.’ (entertainment news)

अर्जुनच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे तर, तो आता ‘सरदार का ग्रँडसन’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अर्जुनबरोबर रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाद्वारे अर्जुन आणि रकुल पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.

Post a Comment

0 Comments