नवी दिल्ली : थोर समाज सुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची उद्या, २३ एप्रिल रोजी १४८ वी जयंती आहे, याचे औचित्य साधत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. रणधीर शिंदे हे “महर्षी शिंदे यांच्या विचारविश्वाची प्रस्तुतता” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३४ वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून “महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला” सुरु आहे. या व्याख्यानमालेत २३ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ रणधीर शिंदे विचार मांडणार आहेत. या व्याख्यानात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या योगदानावर प्रकाश टाकला जाणार आहे. या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
डॉ.रणधीर शिंदे यांच्या विषयी
डॉ. शिंदे हे शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक आणि मराठी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ ते भाषासाहित्याचे अध्यापन करीत आहेत. समीक्षक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आजवर त्यांचे स्वतंत्र चार व आठ संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत.
‘दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता’, ‘शरच्चंद्र मुक्तिबोध व्यक्ती आणि वाङ्मय’ आणि ‘दि. के. बेडेकर’ या पुस्तकांसह ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ , ‘अण्णा भाऊ साठे’ , ‘गोविंद पानसरे’, ‘ग दि माडगूळकर’ ,‘लक्ष्मीकांत देशमुख’ व ‘राजन गवस’ यांच्या निवडक साहित्याची डॉ शिंदे यांची संपादने प्रकाशित आहेत. वाङ्मयीन नियतकालिकांतून त्यांचे ऐंशीहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार मंडळ तसेच साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. बनारस हिंदू विश्वविद्यापिठासह चार विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांच्या लेखनासाठी आजपर्यंत ‘ना. धों. महानोर पुरस्कार’, ‘रा श्री जोग पुरस्कार’ , ‘यशवंत सुमंत पुरस्कार’ , ‘कृ गो सूर्यवंशी’ व ‘शब्दसह्याद्री पुरस्कार’ आदि पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
शुक्रवारी, 23 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मीडिया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.
0 Comments