मांडेगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना जनजागरण रॅलीचे आयोजन ...


बार्शी/धिरज शेळके:

कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी मांडेगाव येथील सरपंच पंडीत मिरगणे नेहमीच विविध सामाजिक आणि आरोग्य विषयक उपक्रम राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि लोकांच्या मनातील भीती घालवून योग्य ती काळजी व उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

या रॅलीमध्ये कोरोना पासून बचाव करण्यासाठी आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायजर वापरणे, मास्क वापरणे, बाहेर न जाणे इत्यादी प्रकारचे विविध संदेश देणारे फलक हातात घेऊन संपूर्ण गावभर हि रॅली काढण्यात आली.  या रॅलीचे विशेष वैशिष्ठय म्हणजे मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे यांनी आपली स्वतःच्या मालकीची चार चाकी गाडी कोरोना व इतर रुग्णांना मोफत रुग्णसेवेसाठी वापरतात ती विविध संदेश देणारी गाडी देखील या रॅलीमध्ये सहभागी करण्यात आली होती आणि या गाडीचे सारथ्य स्वतः सरपंच पंडित मिरगणे हे करत होते. यावेळी आरोग्य  विभागाच्या शारदा गपाट, अंगणवाडी सेविका, मदतनीस,जिल्ह्यापरिषद प्राथमिक शाळा मांडेगाव येथील मुख्याध्यापिका यांच्यासह ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला होता.

Post a Comment

0 Comments