महाराष्ट्रात आठ दिवसांसाठी कडक निर्बंध; लॉकडाऊन बाबत अजून स्पष्टीकरण नाही


मुंबई : राज्यात आज पहिल्या विकेंड लॉकडाऊन ची अमलबजावणी केली जात आहे. राज्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून, बेड आणि आरोग्य यंत्रणा हतबल होणायची शक्यता व्यक्त होत आहे. आशा स्थितीत राज्यात पूर्णतः तीन आठवडे संचारबंदी करण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान केले होते. काळ झालेल्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

आज सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली. याबैठकीत सर्व पक्षीय नेत्यांची मते आणि प्रतक्रिया ऐकून घेण्यात आल्या. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊन ला विरोध दर्शवला असून, फडणवीस यांनी देखील विरोध केला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री घेतील त्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठींबा असेल असे सांगितले आहे.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन बाबत भाष्य केले असून. कडक निर्बंध लादल्या शिवाय पर्याय नाही, नवीन कोरोना विषाणू हा फक्त लसीने थोपवला जाऊ शकत नाही. राज्यातील वाढता प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर लॉकडाऊन हाच पर्याय आहे असे मत देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तज्ञांनी जवळ जवळ १४ दिवसांचा लॉकडाऊन करण्याबाबत मत व्यक्त केले आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. 

आजच्या बैठकीत होणारी चर्चा आणि निर्णय याकडे राज्यात्रील जनतेचे लक्ष होते, राज्यभरात आज विकेंड लॉकडाऊन ची बऱ्या पैकी अमलबजावणी झाल्याचे दिसत आहे. नागरिकांनी अधिक निर्बंध नको असतील तर राज्यसरकारला सहकार्य करत विकेंड लॉकडाऊन पाळण्यात यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments