पंढरपूर पोटनिवडणुकी : राज्य सरकारची कसोटी तर भाजपच्या 'करेक्ट कार्यक्रमा'ची सुरुवात, निकालाची उत्सुकता शिगेला


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल वन मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. राज्याच्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचले आहे. राज्यातील सत्ताधारी विकास आघाडीकडून भगीरथ भालके हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होणार का तर भारतीय जनता पार्टी कडून समाधान आवताडे हे राष्ट्रवादी काँग्रेसला शह देऊन कमळाचा मार्ग सुखकर करणार याबाबतीत चा निकाल दोन मे रोजी लागणार आहे. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, शिवसेनेचे बंडखोर नेत्या शैलजा गोडसे, भाजपचे समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांच्या मत विभागणीचा फटका कोणत्या प्रस्थापित उमेदवारांना बसणार आहे. महा विकास आघाडीचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर भारतीय जनता पार्टीच्या 'करेक्ट कार्यक्रमा'ची सुरुवात पोटनिवडणुकीतील विजयाने होणार अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मतदारसंघाच्या निकालातून मिळणार आहेत.

महाविकास आघाडीच्या विश्वासाची कसोटी तर भाजपच्या करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात.

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर १७ मार्च रोजी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या पोटनिवडणुकीमध्ये भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली. तर भारतीय जनता पार्टी कडून आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीने उद्योगपती समाधान आवताडे यांना रिंगणात उतरविण्यात आले. मात्र या पोटनिवडणुकीत निकालावर महा विकास आघाडी सरकारच्या  दीड वर्षाच्या कामगिरीवर भविष्य ठरणारी आहे तर भारतीय जनता पार्टी कडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन राज्यातील करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रस्थापित पक्षांकडून पोटनिवडणूक हायप्रोफाईल करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीतील विजयानुसार राज्यातील राजकीय गणित मांडली जाणार आहे.

राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा विजय निश्चित...

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या मतदार संघातील लोकप्रियतेचा फायदा भगीरथ भालके यांना होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मानणारा गट दोन्ही तालुक्यांमध्ये सक्रीय आहे. भगीरथ भालके यांच्याबाबतीत असणारी सहानभूतीही आमदारकीसाठी पोषक ठरणार आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा दिवस पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचा दौरा करून आपले राजकीय कौशल्य पणाला लावले आहे. त्यांच्या जोडीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार संजय मामा शिंदे, आमदार रोहित पवार यांच्यासह अर्धा डझन नाव विकास आघाडीतील मंत्र्यांना प्रचार मैदानात उतरवण्यात आले होते. त्यामुळे भगीरथ भालके यांच्या विजयाचा मार्ग सोपस्कर झाला आहे. मात्र शेवटच्या दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोलमडलेली नियोजन व्यवस्था हीबाब भगीरथ भालके यांच्या विजयाचा मार्ग अडथळा निर्माण करणारे ठरणार आहे. स्वाभिमानीचे सचिन पाटील व शिवसेनेचे बंडखोर नेत्या शैलजा गोडसे यांच्या मतविभागणीचा फटका राष्ट्रवादीला असणार आहे. मात्र राजकीय विश्लेषकांनी राष्‍ट्रवादीचे भगीरथ भालके  यांचा विजय निश्‍चित असल्याचे सांगितले आहे.

भाजपचे समाधान आवताडे हे राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम' करून आमदारकीचा मळ घालणार...
भारतीय जनता पार्टी कडून आमदार प्रशांत परिचारक यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे उद्योगपती असणारे समाधान आवताडे यांना रिंगणात उतरविण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील मते विभागणीमुळे भारत नाना आमदार झाले होते. त्यामुळे भाजप कुठूनही आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांना एकत्रित आणून राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात केली. आमदार प्रशांत परिचारक यांचे मतदार संघात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे अवताडे यांच्या विजयाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. तसेच अवताडे गटाची मंगळवेढा तालुक्यात असणारे भरभक्कम प्राबल्य समाधान आवताडे यांच्या विजयात वाटा असणार आहे. तसेच आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांची प्रचार यंत्रणा प्रभावी आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवशी प्रचार कार्यक्रमात सहभागी वातावरण ढवळून काढले होते. याच प्रचार सभेत त्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात येथून करा असे उद्देशून केले होते. मात्र शेवटच्या दोन दिवसात भाजपाच्या नियोजन व्यवस्थाही चोख असल्याचे दिसून आली होती. यामुळे समाधान आवताडे हे राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करुन आमदारकी गळ्यात घेणार असा अंदाज राजकीय तज्ञांनी केला आहे. मात्र त्यांना आमदारकीसाठी चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांच्या मतविभागणीचा फटका किती बसू यावर ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments