मंगळवेढ्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या गेट समोर सोडला जीव


मंगळवेढा/प्रतिनिधी:

 मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या गेट समोर कोरोना बाधित एका महिलेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाल्याची याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा शहरातील साठ वर्षे महिला कोरोना तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आली होती. 

कोरोनाची तपासणी केल्यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.तिला थोडा फार त्रास जाणवत असल्याने ते हे पुढील उपचारासाठी रुग्णालयात जात असताना तिचा ग्रामीण रुग्णालयाच्या गेट समोर योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान पोट निवडणुकीनंतर मंगळवेढा तालुक्यात व परिसरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.  प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments