बार्शी! आमदार राजेन्द्रं राऊत यांच्या त्या भुमिके बद्दल आता यु-टर्न ; माझ्या शब्दाचा विपार्यास काढला गेला


बार्शी/प्रतिनिधी;

बार्शी शहरात ८० टक्के रुग्ण बाहेरचे आहेत बार्शीला होणारा वैद्यकिय सुविधांचा पुरवठा कमी आहे. बाहेरील तालुक्यांनी आम्हाला सहकार्य करावे अन्यथा बाहेरच्या तालुक्यातील रुग्णांना बार्शीत अडवावे लागेल असे वादग्रस्त वक्तव्य बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी काही दीवसापुर्वी केले होते. यावर बाहेरील तालुक्यातून राऊत यांच्या भुमिकेबद्दाल तीव्र संताप व्यक्त होऊन अनेकांनी त्यांचा समाचार देखील घेतला होता. पण माझ्या बोलण्याचा किंवा शब्दाचा विपर्यास केल गेला असून माझ्या मनात बाहेरच्या रुगाणाबाबत कोणताही व्देष नाही व तसे मत देखील नाही. असे राऊत यांनी एका वाहीनीवर बोलताना नुकताच सांगितले आहे.

 

कोरोनाच्या गंभीर परस्थितीवर उपाय योजना करण्यासंदर्भात बार्शी तालुकयातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी वर्गाच्या एका बैठकीत आमदार राऊत यांनी बाहेरील तालुक्यातील रुग्ण बार्शीतील रुग्णालयात येत असल्यामुळे वैद्यकीय सुख-सुविधावर ताण येत असल्याचे सांगून याला पुर्णपणे बाहेरील तालुक्यातील लोक जबाबदार आहेत असा सुर काढला होता. यावेळी शेजारील तालुक्यातील लोकप्रतिनिधींना आज तुम्ही साखर कारखाने उभे करतात आणि साधे हॉस्पिटल उभे करु शकत नाहीत ? आम्ही बगा बार्शीत किती हॉस्पिटल उभे केलेत, शेजारील तालुक्यातील नागरीकांनी याच जाब आपल्या लोकप्रतिनिधींना विचारा अशी अनेक प्रश्न उपस्थित करुन वादाला तोंड फोडले होते. यावर कुर्डवाडीचे हर्षल बागल व मनसेचे सागर लोकरे यांनी देखील तेवढ्याच ताकदीने समाचार घेत ही वेळ राजकारण करण्याची नाही तर सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आहे. आज बार्शी तालुक्याला कर्मवीरांच्या विचाराचा व आचाराचा वारसा आहे, त्यांच्या कर्तुत्वाची व त्यांच्या ममत्वाची जोड आहे. ती सध्याच्या कोणत्याही राजकारण्यात नाही. त्या बरोबरच बार्शी तालुक्यातील आर्ध्याच्यावर अर्थव्यवस्थेला आधार देण्याचे काम हे बाहेरीलच तालुके करत असतात. त्या बरोबरच बार्शीतील अनेक रुग्णालये देखील ही कोरोनाचा काळ सोडला तर यापुर्वीपासून या तालुक्यावरच मोठी झाली आहेत. त्यामुळे जुन्या संस्था टिकवा व नव्या उभ्या करा असे अनेक आरोप प्रत्यारोप हे आमदार राऊत यांच्या विधानामुळे झाले होते.

आज मी रात्रीचा दिवस करुन रुग्णांची काळजी घेतोयः- आमदार राजेंद्र राऊत

बार्शी तालुकयातील सध्य परस्थिती मी त्यावेळी मांडली होती. ती परस्थिती जशी लोकापुढे मांडली होती तशीच ती शेजारील लोकप्रतिनिधी वरिष्ठ प्रशासकिय यंत्रणेपुढे देखील मांडळी होती. पण माझ्या वाक्याचा विपर्यास करुन वास्तव परस्थितीकडे दुर्लक्ष करुन नाही त्या गोष्टीला जास्त महत्व दिले गेल्याचे दिसत आहे. पण बाहेरील रुग्णांना कुणालाही आडवायचे किंवा त्यांना उपचार मिळुनये अशी माझी भुमिका नव्हती. उलट बाहेरील तालुक्यातील रुग्णांची माझ्या एवढी काळजी त्यांचे देखील लोकप्रतिनिधी करत नाहीत. आज मी रात्रीचा दिवस करुन बाहेरील रुग्णांची देखील काळजी घेतोय,एकटाच खिंड लढवतो आहे तरी माझा निषेध करणे योग्य नाही असे मला वाटते.

Post a Comment

0 Comments