सोलापूर/प्रतिनिधी:
राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ ते ४५ वयापर्यंत प्रत्येकाला लसीकरणाचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून नियोजन केले जात आहे जिल्ह्यातील ४६ लाख ६५ हजार नागरिकांपैकी पहिल्या टप्प्यात ३१ लाख नागरिकांची लसीकरण मोहीम पार पडणार असल्यायाची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात मोफत लसीकरण मोहीम
राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट तयार झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ४५ वर्ष वरील व्यक्तींना लसीकरणा सुरुवात केली होती. मात्र कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र तसेच राज्य सरकारने १८ ते ४५ वर्षातील वयोगटातील नागरिकांना एक मेपासून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण मोहीम पूर्ण राज्यामध्ये राबवली जाणार आहे. लसीकरण मोहीम ही पूर्णपणे निशुल्क असणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाईन नाव रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे ३१ लाख नागरिकांना मोफत लसीचे डोस दिले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहीम पूर्ण..
कोरोनाच्या पहिल्या लाटेतील बाधितांमध्ये ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असणाऱ्यांची संख्या जास्त होती. १६ जानेवारीपासून ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविणत आली आहे. ४५ वर्ष वयोगटातील व्यक्तींना कोरोनाविषाणू सोबत लढता यावे म्हणून त्यांना पहिल्या लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. त्याचबरोब कोरोनाना युद्ध म्हणून काम करणाऱ्या नागरिकांना सरकारकडून लसीकरण मोहिमेत भाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यात दहा लाख नागरिकांना लसीकरण मोहीम होणे गरजेचे होते. मात्र अडीच लाख नागरिकांनी याचा लाभ घेतल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.
जिल्ह्यात लसीकरणाचा तुटवडा..
सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना कहर मोठा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. जिल्ह्यातील ४६ लाख नागरिकांपैकी सुमारे ३१ लाख नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होणार आहे. मात्र सध्या जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा मोठा तुटवडा आहे. त्यातच १ मे पासून चालू होणारे लसीकरण मोहिमेमध्ये मोठी मागणी असणार आहे. सध्या नागरिकांना लसीकरणाबाबत केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिम यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे..
लसीकरण मोहिमेत ३३९ केंद्र कार्यरत असणार...
सोलापूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे. त्यामध्ये १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यात जिल्ह्यात सध्या १३१ लसीकरण केंद्रावर मोहीम राबवली जात आहे.त्यामध्ये जिल्ह्यातील १०५ शासकीय केंद्र तर २६ खाजगी केंद्रांवर लसीकरण केले जाते. मात्र १ मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून ३३९ लसीकरण केंद्र असणार आहेत. या लसीकरण केंद्रा लसीकरण याचा लाभ घेता येणार आहे.
0 Comments