मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचा कहर पाहवयास मिळत आहे, त्याचं सर्व यंत्रणा आपले काम जोखमीने करत आहेत. गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील पटेल वेल्फेअर रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली आहे. रुग्णालयात लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाली. हि दुर्घटना रात्री १२.३० वाजताच्या सुमारास झाला. या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती देताना, भरुच पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, भरुचमध्ये रात्री साडे बाराच्या सुमारास पटेल वेल्फेअर रुग्णालयाच्या डेडिकेटेड कोविड केंद्राला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, भरुच एसपी राजेंद्रसिंह चुडासमा म्हणाले की, शॉर्ट सर्किटमुळे आयसीयूला आग लागली, परंतु नंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
0 Comments