सांगोला! लग्नात नियमापेक्षा जास्त गर्दी जमल्याने लग्नाची वरात थेट पोलिस स्टेशनच्या दारात


सांगोला/प्रतिनिधी:

असाच प्रकार आज सांगोला तालुक्यातील बंडगरवाडीत समोर आला. नियम मोडून विवाह सोहळ्यासाठी गर्दी जमवल्या प्रकरणी वधुवरांसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला.

 कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ ब्रेक द चेन ‘अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. लग्न समारंभासाठी दोन तास वेळ आणि केवळ २५ लोकांना परवानगी दिलेली असताना ही ग्रामीण भागात नियम मोडून विवाह सोहळे धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत . अशाच नियम मोडून विवाह सोहळे साजरे करणाऱ्या वधू वरासह त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

असाच प्रकार आज सांगोला तालुक्यातील बंडगरवाडीत समोर आला . निमय मोडून विवाह सोहळ्यासाठी गर्दी जमवल्या प्रकरणी वधुवरांसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला . लग्नाच्या पहिल्याच दिवशी ” लग्नाची वरात पोलिस स्टेशनच्या दारात ” अशी नव दाम्पत्यांची स्थिती झाली आहे . सांगोला तालुक्यातील चिकमहूद अंतर्गत असलेल्या बंडगरवाडी येथे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लग्नकार्य सुरू असून या लग्नासाठी शेकडो वहाडी उपस्थित आहेत, अशी माहिती सांगोला पोलिसांना मिळाली.पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी बंडगरवाडी गाठली . शासनाने घालून दिलेल्या नियमापेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी उपस्थित असल्याने पोलिसांनी नवरा – नवरी सह जवळच्या नातलगांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे.

यामध्ये चिकमहूद येथील नवरदेव , त्याचे वडील , नवरदेवाची आई , कटफळ ( ता.सांगोला ) येथील नवरी मुलगी तिचे वडील , नवरीची आई यांच्यासह धनाजी महादेव अन्य काही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे . पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments