आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे खासदार निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण


उस्मानाबाद/प्रतिनिधी:

कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेसाठी वैद्यकीय सुविधा, सामग्री, मनुष्यबळ किती आवश्यक आहे, हे आपण मागील वर्षभरापासून अनुभवत आहोत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यापासून ते वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींसाठी उपाययोजना करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत. कळंब तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी अडचणीच्या प्रसंगात रुग्णांना तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने आमदार स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

स्थानिक आमदार विकास निधीतून कळंब उपजिल्हा रुग्णालयास व शिराढोन येथील रुग्णालयास अशा दोन रुग्णवाहिका मंजूर करण्यात आलेल्या असून कळंब उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका आज सुपूर्द करण्यात आली व शिराढोन सामान्य रुग्णालयाची रुग्णवाहिका येणाऱ्या आठ दिवसात सुपूर्द करण्यात येईल. रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचविण्याचे महत्त्वाचे काम या रुग्णवाहिकांमुळे शक्य होणार आहे. 

कळंब तालुक्यातील रुग्णांना तातडीने उपचार मिळवण्यासाठी अन्य रुग्णवाहिकाप्रमाणे या रुग्णवाहिकेचा उपयोग होईल असा विश्वास आहे. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, विधानसभा संघटक तथा डिकसळचे उपसरपंच सचिन काळे, पं. स.सदस्य गजेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ-होळे मॅडम, तहसिलदार रोहन शिंदे, वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे, डॉ. अभिजित लोंढे, डॉ. अभिजित जाधवर, डॉ. स्वप्निल शिंदे, बालरोगतज्ज्ञ डॉ. विवेक शिंदे,रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हर्षद अंबुरे, दिलीप पाटील आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments