पत्नीची छेड काढली म्हणून मोठ्या भावांची हत्या ; आई व पत्नीच्या मदतीने मृतदेहाचे लावली विल्हेवाटही घटना केरळ राज्यातील कोल्लम गावात घडली
बऱ्याच वर्षांनी मोठा भाऊ घरी आला. त्याने छोट्या भावाच्या पत्नीची छेड काढली. त्याचा राग मनात घेत लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली. इतकंच नाही, त्याचा मृतदेह पत्नीच्या आणि आईच्या मदतीने स्वतःच्या घराच्या मागेच पुरला. ही हत्या होऊन दीड वर्षांनंतर मृत्यू छडा लागला. 

मोठा भाऊ बरीच वर्षे घरापासून लांब होता. २०१८ मध्ये आपल्या घरी तो परतला होता. असं सांगितलं जातं की, शाजीने आपल्या छोट्या भावाच्या म्हणजेच साजीन पीटर पत्नीचा विनयभंग केला होता. त्यानंतर साजीनने आपल्या भावाची हत्या केली.

जेव्हा एका व्यक्तीच्या मदतीने या सर्व घटनेचा खुलासा झाला तेव्हा हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांना साजीन पीटर, त्याची आई आणि पत्नी यांना ताब्यात घेतले. जेव्हा शाजी पीटरचा मृतदेह बाहेर काढला गेला, पोलिसांच्या लक्षात आले की, व्यवस्थित नियोजन करून, मृतदेहाचा दुर्गंध येऊ नये याची काळजी घेतली होती.

Post a Comment

0 Comments