शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व त्यांची पत्नी संयोजनी राजे कोरोना पॉझिटिव्ह ;बार्शीत उपचार सुरू


उस्मानाबाद/प्रतिनिधी:

 शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व त्यांची पत्नी संयोजनी राजे निंबाळकर या कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून त्यांच्यावर बार्शी येथील जगदाळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

या दोघांची प्रकृती चांगली आहे . यापूर्वी खासदार यांचे बंधू जय राजे हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते त्यांनतर त्यांची तपासणी करण्यात आली त्यात पती पत्नी पॉझिटिव्ह आले आहेत तर खासदार ओमराजे यांचे स्वीय सहायक संतोष खोचरे हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना पॉलिटेक्निक कॉलेज येथील क्वारनटाईन सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे त्यांचीही प्रकृती चांगली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून अनेक कुटुंबच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने स्तिथी गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन मास्क सॅनिटाइझर चा यौग्य वापर करावा तसेच लसीकरण करावे असे आव्हान आमदार कैलास पाटील यांनी केले आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments