अभिनेत्री ट्विंकल खन्नाचं कोरोना रुग्णांच्या साहाय्यासाठी मदतीचं पाऊल ; सर्व स्तरावर होतोय कौतुकाचा वर्षाव


कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अभिनेत्री ट्विंकल खन्नाही पुढे आली आहे. ट्विंकल खन्नाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे. यात तिने अधिकृत आणि विश्वासार्ह एनजीओची माहिती मागितली आहे. जे रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन सिलेंडर पुरवतात. मी त्यांना थेट लंडनवरुन ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करेन. असे ट्विट ट्विंकलने केलं आहे.

सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनासोबत वैद्यकीय सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सध्या अनेक सेलिब्रिटी त्यांच्या मदतीसाठी स्वतःहून पुढाकार घेत आहेत. यात ट्विंकल खन्नाचाही समावेश आहे. तिने नुकतेच एक नावेत केले आहे, ज्यात तिने म्हटले आहे कि, कृपया मला एका सत्यापित, विश्वसनीय, नोंदणीकृत एनजीओची लीड द्या जी १०० ऑक्सिजन सिलेंडर वितरीत करण्यात मदत करेल.

कोरोना महामारीच्या काळात देशावर असलेल्या संकटाच्या काळात अक्षय आणि ट्विंकलच्या प्रयत्नांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. या संवेदनशील स्वभावाचं सोशल मीडियातून चाहते भरभरून कौतुक करीत आहेत.  काही दिवसांपूर्वी खिलाडी कुमारलाही कोरोनाची लागण झाली होती. पण त्यावर अवघ्या नऊ दिवसांत मात करत अक्षय घरी परतला होता. 


 

Post a Comment

0 Comments