माणुसकीला काळीमा! मृताच्या खिशातील रोख रक्कम चोरताना रुग्णालय कर्मचारी सीसीटीव्हीत कैद


धुळे: 

कोरोना महामारीत सर्वत्र हाहाकार माजला आहे. काहीजण इतरांच्या मदतीसाठी सर्वस्व अर्पण करत आहेत. तर, काही संधीसाधू लोक माणुसकीला काळीमा फासत आहेत. असाच धक्कादायक प्रकार धुळे शहरात तेल वाडीभोकर रोडवरील खाजगी रुग्णालयात समोर आला आहे.

 या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृत कोरोनाबाधिताच्या खिश्यातील रक्कम काढून घेतल्याचे सीसीटीव्ही चित्रिकरण समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या वस्तूंसोबत ती रक्कम परत दिली नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला याबाबत विचारणा केली. मात्र, रुग्णालय प्रशासनाने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. विनवण्या केल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना सीसीटीव्ही चित्रिकरण दिले. त्यामध्ये रुग्णालयातील कर्मचारी मृताच्या खिश्यातील रक्कम काढून घेत असल्याचे स्पष्ट दिसले.

असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. आता रुग्णालय प्रशासन कर्मचाऱ्यांवर कारवाई करते की, जिल्हा प्रशासन या रुग्णालयावर कारवाई करते याची प्रतिक्षा आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र, याबाबत माहिती देण्यास टाळले आहे.

Post a Comment

0 Comments