अभिमान ढाणे राज्यशास्त्र विषयातून सेट उत्तीर्ण



बार्शी/प्रतिनिधी:

पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या डिसेंबर २०२० सेट परीक्षेत राज्यशास्त्र विषयातून अभिमान अरुण ढाणे "SET" Maharashtra State Eligibility Test (MH-SET) उत्तीर्ण झाले आहेत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या यशामध्ये आई- वडील,मामा, भाऊ हनुमंत व दोन्ही बहिणी यांचा मोलाचा वाटा आहे.

त्यांनी शिवाजी महाविद्यालय बार्शी मधून एम ए राज्यशास्त्र विषयातून केले. ते सध्या शिवाजी विद्यापीठातून एम फिल करत आहेत, च्या यशासाठी त्यांना प्रा. नागेश चोबे, प्रा. शेषनारायण वडवे, प्रा. मारुती लोंढे, प्रा. नकुल खवले यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments